You are always with us, Pappa.
![]() |
| २०१७ नोव्हेम्बर |
प्रिय पप्पा,
कुठून सुरुवात करू पप्पांविषयी लिहिताना ?
हा ब्लॉग लिहायला मला जवळपास सहा महिने लागले. ऑफिसहून परत आल्यावर जेव्हा जेव्हा मी लिहिण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तेव्हा सगळे videos बघून तुमच्या आठवणींमध्ये खूप उदास वाटायचं. पहिला अनुभव असल्यामुळे मला समजत नव्हतं की हे सगळं कसं accept करायचा असतं ते. First experience of bereavement could really be difficult. Maybe वेळेसोबत आपण पुढे जात राहतो.
कुठून सुरुवात करू पप्पांविषयी लिहिताना ?
शांत स्वभाव, अतिशय साधी राहाणी, पापभिरू वृत्ती, शिस्तीची खास आवड, टापटीप, प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी करणं. तुम्ही हे सगळं करत होतात, अथकपणे, अनेक वर्षं. You have truly been the gem of a person.
| २०१२ जानेवारी |
तुम्हाला मी जवळजवळ १० वर्षं ओळखत होते. I remember your smile the most. ह्या फोटोमध्ये आहे अगदी तशीच. तुम्ही generally आनंदी असायचात. नेहमीच!!! You seemed content all the time. Happy. Hopeful. Full of life. Always!!!
तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये interest असायचा. I always wondered about your enthusiasm about going to different places. Your stamina was incredible in spite of having health issues. You would always push me and Mandar for weekend outings. तुम्ही दर शनिवारी सकाळी विचारायचात - आज कुठे जाऊयात ?
You always had your errands to run; कधी भाजी आणायला तर कधी पूजेसाठी फुलं आणायला, कधी मित्राला भेटायला तर कधीतरी फक्त कोणाला सोबत म्हणून. तुमच्या पायाला चाकं लागलेली होती. तरीही कधी कधी तब्येतीमुळे तुम्हाला घरीच आराम करावा लागायचा.
I enjoyed with you always, but the most exciting times were when we were into gardening. आपली झाडं तुमची खूप आठवण काढतात. खूप फुलं येतात पप्पा.
![]() |
| घरची फुलं |
एक गोष्ट जी अनेकांना जमत नाही ती तुम्ही सहजपणे जगात होता, ती म्हणजे प्रत्येकाला त्याच्या गुण - दोषांसकट accept करणं . I truly admired that you loved your people with all their positives and negatives.
![]() |
| नोव्हेंबर २०१६ |
गेल्या वर्षी तुमच्या आठवणींचा कार्यक्रम केला आपल्या घरी. People had so many good things to talk about you, Papa. They were missing your presence that day. त्यांच्याकडे अनेक छान छान आठवणी आहेत तुम्ही दिलेल्या.
या ब्लॉग मध्ये अनेक videos आहेत. त्यांची एक common link इथे दिली आहे. https://photos.app.goo.gl/oK8XQrgTKDxvy6Do1
रविदादांनी तुमचे अनेक किस्से सांगितले . He is missing you, मामा पेक्षा मित्र म्हणून अधिक . तुमच्याकडून त्यांनी ज्या गोष्टी आत्मसात केल्या त्याविषयी पण आठवण सांगितली . तुमच्या धार्मिकपणाविषयी सुद्धा ते बोलले.
VIDEO # 1
मीनल वहिनीने गाडी चालवण्याचे धडे तुमच्याकडून घेतले होते. तिने तुमच्या काटक आणि कामसू वृत्तीबद्दल सुद्धा सांगितलं. तुमच्या अंगी असलेली स्वच्छतेची आवड आणि मन लावून कोणतंही काम कसं करायचं याविषयी वहिनीने काही आठवणी सांगितल्या. तुम्ही कधीही कुणाला लागेल असं बोलल्याचं कुणाला आठवत नाही पप्पा . तुम्ही बोलू शकत नव्हता असं मुळीच नव्हतं पण, तुम्ही नेहमीच समोरच्या माणसाच्या मनाचा जास्त विचार करायचात. एखाद्याला वाईट वाटेल असे शब्द तुम्ही वापरल्याचे कुणालाही आठवत नाही.
VIDEO # 2
Then Ravi Dada also shared his nostalgia on Ganapati festival and Papa being part of it with Wadikars...
VIDEO # 3
Everybody wanted to talk about you . Thoughts were just flowing one after the other. There is so much of good karma earned by you, it was showing in everyone's speech. सुलभा काकू, उमा काकू, शशी आत्या , प्रकाश काका, श्रीनिवास दादा, विद्या काकू - सगळ्यांनी तुमच्या निरनिराळया आठवणी सांगितल्या.
VIDEO # 4
सुलभा काकूंची "थालीपीठ - शेंगदाण्याच्या चटणीची" आठवण, प्रमोद मामाने सांगितलेली "आईला भाकरी करायला शिकवली" ती आठवण. मग रविदादांनी "Mahindra Day ची" आठवण सुद्धा सांगितली. २००६ च्या पूरामध्ये पप्पानी कंपनीची एक अतिशय मौल्यवान machine कशी वाचवली होती त्याची आठवण करून दिली.
![]() |
| २०१४ |
तुम्ही गुपचूप काही गोष्टी tape recorder वर रेकॉर्ड करायचंय अशी आठवण सुद्धा प्रमोद मामांनी सांगितली.
तुम्हाला नेहमी तुमच्या गोष्टींविषयी अभिमान वाटायचा . तुम्ही नेहमी "सातारा , महिंद्रा" अशा सगळ्या गोष्टींविषयी अस्मिता बाळगली पण कधीच अहंकार दाखवला नाही. You have always been down to earth.
तुम्ही आम्हाला नेहमी सांगत आलात की कुणाचं चुकलं तरी दुर्लक्ष करा वादात पडू नका.
![]() |
| मे २०१६ |
मंदारला बरं नव्हतं तो संपूर्ण काळ आणि त्याच्या surgery चा काळ आमच्या साठी खूप कठीण होता . पण पप्पांच्या आधारामुळे तो काळ पुढे सरकू शकला. तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर कधीच tension दाखवलं नाही. तुम्हालाही tension होतंच . पण आम्ही कुठेही डगमगू नये म्हणून, तुम्ही नेहमी खंबीर चेहऱ्याने समोर आलात. सतत हिम्मत देत राहिलात . I MISS THAT SUPPORT PAPPA . I MISS YOUR PRESENCE.
मानसीने महिंद्रा मधून मिळणाऱ्या हॉटेल व्हाऊचर ची आठवण सांगितली. तुमच्या सोबत प्रमोद मामा किंवा उदय दादा किंवा राजूकाका अशी एखादी तरी extended family असायची. You really loved all your people.
VIDEO # 5
![]() |
| २०१५ |
![]() |
| २६ ऑगस्ट २०१५ |
| अलिबाग (Photo Courtesy - अथर्व क्षीरसागर ) |
VIDEO # 6
![]() |
| २०१५ विष्णू जी कि रसोई मुंबई |
VIDEO # 7
आविष्कारने पप्पांच्या अनेक आठवणी share केल्या . त्याने नेहमी पप्पांमध्ये "एक मित्र" पहिला. ऑफिसमधला पप्पांचा meticulous attribute सांगताना त्याने ऑडिट चा एक किस्सा सांगितला. त्यांच्या पुण्याच्या सोसाटीमधल्या लहान मुलांमध्ये पप्पा किती प्रसिद्ध होते ते पण तो सांगत होता.
![]() |
| २०१३ |
VIDEO # 8
![]() |
| २०१३ |
मनोज काकांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या.
VIDEO # 9
शोभा काकूने आणि रणधीर काकांनी पप्पांविषयीच्या रक्षाबंधनाच्या काही आठवणी सांगितल्या.
VIDEO # 10
![]() |
| २०१४ |
श्रीनिवास दादांनी पप्पांच्या बालपणाच्या काही करामती सांगितल्या. ते खूप active होते. सतत ते कोणत्यातरी activity मध्ये busy असायचे. शशी आत्यांनी हि मुलं असताना सिनेमा बघून आल्यावर गुपचूप घरात कसे प्रवेश करायचे ते सांगितलं.
विद्याकाकू सांगत होत्या कि, डॉक्टर काका गाडी चालवायची कशी हे शिकवताना त्यांना ओरडायचे, पण मग पप्पांनी शांतपणे न चिडता काकूला पण गाडी चालवायला शिकवली. सुट्टीत सातारला गेल्यावर पप्पा vacuum cleaner घेऊन घर स्वच्छ करायचे. रविदादांनी मानसीच्या पहिल्या वाढदिवसाची आठवण सांगितली. मानसीने अलीकडची swimming शिकायची आठवण पण share केली .
प्रमोद मामाने पण दोनचाकी चारचाकी सगळं काही पप्पांकडून शिकले. त्यांनी आणि पप्पांनी मिळून ट्रॅव्हल साठी omni विकत घेतली होती.
आठवणी न संपणाऱ्या आहेत. तुम्ही दिलेलं प्रेम न संपणारं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येकाला तुम्ही काहीनाकाही तरी नवीन शिकवलं, पप्पा. आणि आम्हा सगळ्यांना तुमचा लाघवी स्वभाव खूप आवडायचा . तुमचं सगळ्यांविषयीचं खरंखुरं प्रेम, सगळ्यांबद्दल आपुलकी हे खूप आठवतंय सगळ्यांना. त्यामुळे पुढे एकच motto लक्षात ठेऊ जे तुम्ही नेहमी आचरणात आणलं "जो कर हस कर कर".
JUST BE WITH US , ALWAYS.
WE ALL LOVE YOU, FOREVER.
| अलिबाग (Photo Courtesy - अथर्व क्षीरसागर ) |

















Mast re....
ReplyDeleteचांगली मांडणी केली आहेस. छान आहे ब्लॉग.
ReplyDeleteKhup chhan !
ReplyDeleteअगदी Laxman मामला आवडला असता असा आहे.
ReplyDeleteMastउपक्रम.
Very nicely put. He was indeed a simple man, with a simple aim in life - to be happy always.
ReplyDelete